ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांना माधवराव गायकवाड स्मृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By संजय पाठक | Published: July 18, 2024 11:54 AM2024-07-18T11:54:11+5:302024-07-18T14:05:25+5:30
५१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र शाल असं पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि खंडकरी शेतकरी चळवळीचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मृती जपण्यासाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या जीवनगौरव पुरस्कारासाठी संभाजी नगर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांची निवड करण्यात आली आहे. 51 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र शाल असं पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात भालचंद्र कांगो यांच्या कर्मभूमीत म्हणजेच संभाजीनगर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याआधी हा पुरस्कार खासदार राजू शेट्टी, कॉम्रेड एम.ए. पाटील,मोहन शर्मा, कॉ.तुकाराम बसवे कॉम्रेड सुकुमार दामले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला आहे अशी माहिती माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष ऍड. साधना गायकवाड, सचिव राजीव देसले यांनी दिली. दरम्यान यंदा कॉम्रेड माधवराव गायकवाड जयंती शतक महोत्सव 18 जुलै 2024 ते 18 जुलै 2025 पर्यंत देशभर साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने माधवराव गायकवाड यांच्या चळवळींना उजाळा देणाऱ्या देणारा गौरव ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे.