त्र्यंबकेश्वरच्या विशेष लॉकडाउन निमित्ताने मध्यप्रदेशच्या मजुरांना परत माखारी फिरवले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:30 PM2020-04-18T16:30:55+5:302020-04-18T16:32:23+5:30
त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशमधुन कामांसाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही. म्हणून हे मजुर आपल्या घराकडे पायी निघाले असतांना त्यांना एका ट्रकमधुन त्यांना अंबोली चेक पोस्टजवळ उतरवुन देण्यात आले. पण तेथील पोलीसांनी त्यांना नाशिक जिल्ह्यात येण्यास रोखले.परत पाठवून दिले.
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशमधुन कामांसाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही. म्हणून हे मजुर आपल्या घराकडे पायी निघाले असतांना त्यांना एका ट्रकमधुन त्यांना अंबोली चेक पोस्टजवळ उतरवुन देण्यात आले. पण तेथील पोलीसांनी त्यांना नाशिक जिल्ह्यात येण्यास रोखले.परत पाठवून दिले.
मूळचे मध्येप्रदेशचे असलेले कामगार पालघर येथे कामासाठी गेले होते. लॉकडाऊन मुळे ते परत आपल्या मूळ गावी निघाले मात्र कोणतेच वाहन नसल्याने ते पायी निघाले रस्त्यात त्याना एक ट्रक भेटला आण िट्रक मध्ये हे सर्व कामगार अंबोली जवळ आणू सोडले ते पुन्हा पुढे आपले लहान लहान मुले घेऊन पायी पायी निघाले, मात्र त्याना पोलिसांनी पुढे जाण्यापासुन अडवले, आणि रात्रभर तिथेच काढावी लागली. याबाबतची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी श्रमजीवी संघटनेचे तुकाराम लचके यांना मिळाली त्यांनी त्या सर्व कामगारांना एकत्र करून चहा दिला व याबाबत तहसीलदार यांना कळविले. सकाळी ८ वाजता याबाबत माहिती प्रशासनाला देऊन देखील अजून कोणीही आले नव्हते. या कामगारांच्या व्यवस्थे बाबत तालुका प्रशासनाने हात वर केले.
त्या कामगारांना परत पालघरला पाठवा असे पोलिसांनी सांगितले. पण यासंदर्भात मला असा कुठलाच फोन आला नसल्याचा तहसिलदार दीपक गिरासे यांनी सांगितले. यासंदर्भात आमचे अधिकारी पोलीस आहेत, ते योग्य ते निर्णय घेतील.त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांना इथे का थांबवले ते पायी चालले होते तर तुम्ही का त्याना इथे थांबवले असे उलट प्रश्न आमच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केला.
यांची तात्काळ व्यवस्था करावी याबाबत उप विभागीय अधिकारी यांनाही विनंती केली होती. असे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पण कोणी आले नाही. ते मजुर परत पालघरला गेल्याचे समजते.