मेळा बसस्थानक भूमिपूजन : दोन्ही बाजूंनी शक्तिप्रदर्शनाची तयारी सेना-भाजपा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:11 AM2017-07-30T01:11:09+5:302017-07-30T01:13:20+5:30
भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी त्र्यंबक मेळा बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने नाशकात पहिल्यांदाच व्यासपीठावर येत असून, त्यातही शिवसेना आक्रमक भूमिकेत आहे, तर मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे भाजपानेही मागे न राहण्याचे ठरविले आहे.
नाशिक : अडीच वर्षे सत्तेत एकत्र राहूनही नाशिक जिल्ह्यात विकासकामांच्या प्रश्नावरून परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाºया त्र्यंबक मेळा बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने नाशकात पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत असून, त्यातही या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी परिवहन खात्याने व पर्यायाने शिवसेनेच्या ताब्यातील खात्याने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शिवसेना आक्रमक भूमिकेत आहे, तर मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे भाजपानेही मागे न राहण्याचे ठरविले आहे. सत्तेतील सहभागी भाजप-सेनेत नाशिक जिल्ह्यात विस्तवही जात नाही, अशा प्रकारचे पराकोटीचे राजकीय वैर असून, भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सेनेने सोडली नाही. मध्यंतरी नाशिकच्या प्रश्नांवर आपल्याच सरकारच्या धोरणांविरुद्ध सेनेने मोर्चा काढून एकप्रकारे भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला, त्याचबरोबर नाशिक शहरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजपाचे केंद्रीय व राज्यातील अनेक मंत्री वेळोवेळी शहरात दाखल झाले असता सेनेच्या मंडळींनी या कार्यक्रमात अनुपस्थित राहून एकप्रकारे भाजपावर बहिष्कारच