कोरोना बाधित रुग्णांसाठी माेफत रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:41+5:302021-04-29T04:11:41+5:30

राजीवनगर येथील प्रभाग क्र. ३० मधील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने माझा परिसर माझी जबाबदारी ...

Mafat rickshaw for corona infected patients | कोरोना बाधित रुग्णांसाठी माेफत रिक्षा

कोरोना बाधित रुग्णांसाठी माेफत रिक्षा

Next

राजीवनगर येथील प्रभाग क्र. ३० मधील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने माझा परिसर माझी जबाबदारी अंतर्गत ब्रेक द चेन साठी कोरोना बाधित रुग्णांना दवाखान्यात,लॅबमध्ये तपासणी किवा दवाखान्यात दाखल करण्यासाठी परिसरातील गरजू लोकांसाठी मोफत रिक्षा वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ७०५८९९८८७६ येथे संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष सागर देशमुख व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------

मोफत भोजन व्यवस्था

आर्ट ऑफ लिविंग व राम जानकी सेवा संघ ट्रस्ट यांच्या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला व घरातील सदस्याला विनामूल्य जेवण सेवा शहरातील घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही सेवा ज्यांना हवी आहे, त्यांनी सकाळी ९ च्या आत आणि सायंकाळी ४ वाजेच्या आत चिराग पाटील ९९२२१३६३७८ येथे संपर्क साधावा व लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ९ तारखेपासून ही सेवा मोफत देण्यात येत आहे. दररोज ३०० ते ४०० नागरिकांना मोफत सेवा दिली जात आहे. डबे पोहोचविण्यासाठी प्रशांत जाधव, अप्पा कदम, पवन खेतवानी, भूषण मलिक, गुंजन देशमुख, मुकुंद निकुंभ, एस. बी. हांडे यांनी नियमित योगदान दिले.

-----------------

(डमीसाठी मजकूर आहे.) फोटो नावाने

Web Title: Mafat rickshaw for corona infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.