लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:59 PM2018-09-19T16:59:38+5:302018-09-19T17:01:56+5:30

कळवण : कच्चा मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चामुळे कागदाचे दर महाग झाले. शाई व मुद्रण साहीत्य यांच्या किंमती देखील वाढल्या. शिवाय कुशल कामगारांचा खर्च वाढल्याने या महागाईचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

Magazine, invitations will be expensive | लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका महागणार

लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका महागणार

googlenewsNext
ठळक मुद्देव्यावसायिक अडचणीत : कागद, शाई साहीत्यांच्या किंमतीत वाढ

कळवण : कच्चा मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चामुळे कागदाचे दर महाग झाले. शाई व मुद्रण साहीत्य यांच्या किंमती देखील वाढल्या. शिवाय कुशल कामगारांचा खर्च वाढल्याने या महागाईचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
कागदाच्याही किंमती वाढल्यामुळे लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, दिनिदर्शका, अहवाल, डायरी, व्हिजिटिंग कार्ड, वही, फाईल, फोल्डर आदींच्या किंमती आता वाढणार असल्याने त्याचा परिणाम मुद्रण, प्रकाशन व्यवसायावर होणार आहे. मुद्रण व्यावसायिकांनी मुद्रण, छपाईच्या दरांमध्ये ३० टक्के एवढी वाढ करुन ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.
कागदासोबतच शाई महागल्यामुळे मुद्रक अडचणीत आहे. छपाईसाठी मोठ्या प्रमाणात शाईची गरज असते. कागद, मुद्रण शाई, मुद्रण साहित्य यांच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ, कुशल कामगारांसाठी होणारा खर्च आणि यासंदर्भात शासनाची असणारी उदासीन भूमिका, या महत्वाच्या बाबींमुळे मुद्रण क्षेत्र हे अडचणींचा सामना करत आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेल्या कागदाच्या भरमसाठ दरवाढीमुळे सध्याच्या किमतीमध्ये प्रिंटिंग करून देणे ही मुद्रण व्यावसायिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुद्रण व्यावसायिकांच्या दरांमध्ये किमान ३० टक्के दरवाढ केल्याने त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
या व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे.
नवीन उच्च दर्जाची यंत्रसामग्री ही परदेशातून मागवावी लागते. यंत्रसामग्री अतिशय महाग आहे. सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करते.त्यामुळे त्याची किंमत देखील आवाक्याबाहेर जाते. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे दर्जा सुधारतो मात्र, त्याचे उत्पादनशुल्क देखील वाढत असल्याने मुद्रण व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पुणे येथील संघटनेने ३० टक्के दरवाढ गरजेचे असल्याचे सांगितल्याने ही दरवाढी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. दीड वर्षापूर्वी १७ टक्के दरवाढ करण्यात आली होती. आता ३० टक्क्यांनी दरवाढ झाल्याने लग्नपत्रिका, पत्रके, निमंत्रण पत्रिका, भिंती पत्रके, लेटरहेड, व्हीजीटीगं कार्डस् आदीमध्ये वाढ होणार आहे.

कागद ,शाई इतर साहित्य यांची दरवाढी झाल्याने प्रिंटीग व्यवसायाला फटका बसणार आहे. कागदाच्या किमतीमध्ये किलोमागे सुमारे १५ ते २० रु पयांपर्यंत वाढ झाली. सध्याच्या किमतीमध्ये प्रिंटींग करून देणे अशक्य आहे.त्यामुळे सर्वच छपाई दरात वाढ होणार आहे.
- उमेश सोनवणे, संचालक प्रिंटिंंग व्यावसायिक, कळवण.

Web Title: Magazine, invitations will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक