संगीताच्या जादूने भुरळ
By admin | Published: February 9, 2015 02:04 AM2015-02-09T02:04:15+5:302015-02-09T02:04:49+5:30
संगीताच्या जादूने भुरळ
नाशिक : लकी अलीचे जादूई स्वर, वाइनचे सिप अन् डान्स अशा बेधुंद करणाऱ्या वातावरणाबरोबरच सॅण्ड्युनेस, मुंबई बासमेंट, विल अॅण्ड द पीपल, स्पीड कॅराव्हन, लकी अली, जेण्टलमन्स डब क्लब, न्यूक्लेया या कार्यक्रमांसह दुसऱ्या दिवशी ‘सुला फेस्ट’चा समारोप झाला. दिलखुलास, रोमांचकारी आणि सर्वांना थिरकायला लावणाऱ्या लकी अलीच्या संगीताच्या जादूने भुरळ घालत प्रत्येकाला डान्स करण्यास भाग पाडले. वायनरीच्या ग्रीक पद्धतीच्या खुल्या अॅम्पिथिएटरमध्ये जादूई वातावरणात धमाल संगीत, विविध चवींचे खाद्यपदार्थ, वाइन, फॅशन आणि शॉपिंगची मजाही येथे नागरिकांना लुटता आली. या महोत्सवाचे प्रायोजक व्हेरो मोडा यांच्या स्प्रिंग समर कलेक्शनसह विविध स्टॉल्स येथे लावण्यात आले होते. त्यामध्ये बुल रायडिंग, वारली पेंटिंग, स्केच, टॅटू, टैरो कार्ड, फूड स्पा, ज्वेलरी अशा स्टॉल्सचा समावेश होता. या फेस्टिव्हलसाठी हजारो देशी-विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली.