जायखेड्यात चाँदशहावली बाबांचा उरूस
By Admin | Published: May 10, 2016 10:16 PM2016-05-10T22:16:31+5:302016-05-10T22:19:46+5:30
जायखेड्यात चाँदशहावली बाबांचा उरूस
जायखेडा : ब्रिटिश काळापासूनची अखंड परंपरा असलेला व हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून सुप्रसिद्ध असलेला बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील चाँदशहावली बाबा उरूस उत्सव उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जायखेडा पोलीस ठाण्यातील चाँदशहावलीबाबाच्या दर्ग्यापासून ते जुन्या इंग्रजी शाळेतील चाँदशहावलीबाबाच्या पुरातन दर्ग्यापर्यंत सवाद्यसंदल मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत जायखेडा व परिसरातील सर्व जातिधर्मांचे बांधव सहभागी झाले होते. संदल मिरवणुकीनंतर हिंदू मुस्लीम धर्मातील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पुढारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली.
या वेळी उरूस उत्सव कमेटी अध्यक्ष संजय बच्छाव, उपाध्यक्ष राजेंद्र साळवे, उपसरपंच संजय मोरे, सटाणा पो.नी. बशीर शेख, स.पो.नी. नंदराज पाटील, राजेंद्र होळकर, माजी पं.स. सभापती सोमनाथ ब्राह्मणकार, गंगाधर गोसावी, माजी सरपंच शांताराम अहिरे, उरूस उत्सव समितीचे अध्यक्ष संजय बच्छाव, उपाध्यक्ष राजेंद्र साळवे, सोसायटी सभापती चंद्रसिंग सूर्यवंशी, अनिल अहिरे, उपसरपंच संजय मोरे, पो. ह. बाळू माळी, राजेंद्र सावळे, दादामियाँ मन्सुरी, नारायण मोरे, शिफक काद्री, दत्तात्रेय अहिरे, निसरखाँ पठाण, नवलसिंग खैरनार, भास्कर अहिरे आदिंसह चाँदशहावली बाबा उरूस उत्सव समिती सदस्य व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दर्गा परिसरात यात्रा उत्सव झाला.
उरूस उत्सवाच्या यशस्वीतेसाठी चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव कमेटी, गावातील विविध सामाजिक संस्था व विविध मंडळांचे कार्यकर्ते, जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)