इच्छामणी मंदिरात भव्य रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:05 AM2019-02-09T00:05:26+5:302019-02-09T00:32:18+5:30

नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छामणी मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त ५० बाय १२ फूट भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.

Magnificent rangoli in the Wishamani temple | इच्छामणी मंदिरात भव्य रांगोळी

उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिरात ५० बाय १२ फूट आकाराची भव्य रांगोळी काढण्यात आली़ माघी गणेशोत्सवानिमित्त येथील नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महारांगोळीचे आयोजन करण्यात आले होते़ महारांगोळीमध्ये बालगणेश, पार्वती मातेचे चित्र महादेव पिंड, कमळ रेखाटले आहे. गणेश मुद्रा गोपद्म केंद्रे वर्धिनी शृंखला अशी संस्कारभारती रांगोळी प्रतीकेदेखील काढण्यात आली आहे. रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक तसेच भाविकांची गर्दी झाली होती़

googlenewsNext

नाशिकरोड : नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त
विद्यमाने इच्छामणी मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त ५० बाय १२ फूट भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.
श्री गणेश जयंतीनिमित्त श्री इच्छामणी गणेश मंदिरात काढण्यात आलेल्या महारांगोळीमध्ये बालगणेश, पार्वती मातेचे चित्र महादेव पिंड, कमळ रेखाटले आहे. तसेच गणेश मुद्रा गोपद्म केंद्रे वर्धिनी शृंखला अशी संस्कारभारती रांगोळी प्रतीकेदेखील काढण्यात आली
आहे.

श्री गणेश जयंतीला संध्याकाळी या रांगोळीवर ३००पेक्षा जास्त दीप प्रज्वलित करण्यात आले़ महारांगोळी प्रमुख पूजा अष्टेकर, शीतल अष्टेकर, जान्हवी रास्ते, सिल्केशा अहिरे, हेमलता चौहान, सुजाता जोशी, मंदा मुदलियार आदी २० महिलांनी सहभाग घेऊन महारांगोळीचे काम पूर्ण केले.

Web Title: Magnificent rangoli in the Wishamani temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.