शिवजन्मोत्सवानिमित्त महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:41 AM2021-02-20T04:41:00+5:302021-02-20T04:41:00+5:30

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी शिवरायांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात ...

Maha Aarti on the occasion of Shiva Janmotsavani | शिवजन्मोत्सवानिमित्त महाआरती

शिवजन्मोत्सवानिमित्त महाआरती

Next

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी शिवरायांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीने रात्री बारा वाजता महाआरती केली, तर लेखानगर सकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजा व महाआरती करून ३९१ किलोचे अकरा हजार लाडू वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनशने सामनगाव येथील वृद्धाश्रामत फळांचे वाटप केले, तर जिजाऊ ब्रिगेडतर्फे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त शहरात झेंडे व पताकांमुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. चौकाचौकांत शिवरायांच्या जीवनावरील पोवाड्यांचे सूर कानी पडत होते. कोरोनामुळे मिरवणुका होणार नसल्या तरी शिवप्रेमींकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवरायांना ३९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवजन्मोत्सव समित्या आणि उत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत शहरातून चारचाकी, दुचाकी वाहनांची रॅली काढून जल्लोष साजरा केला. त्याचप्रमाणे शहरातील रविवार कारंजा, घनकर लेन, अशोकस्तंभ, गंगापूर रोड, कॉलेज रोड, भद्रकाली, जुने नाशिक, मखमलाबाद नाका, पंचवटी, दिंडोरी रोड. इंदिरानगर, उपनगर परिसर शिवजन्मोत्सवाच्या मोठमोठ्या फलकांनी फुलून गेला होता.

सिडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. सातपूरला साजरा होणाऱ्या सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी सावरकरनगर येथील जाणता राजा मैदानावर आयोजित ‘शंभूराजे’ या ऐतिहासिक महानाट्याची तयारी पूर्ण झाली असून, हे महानाट्य सायंकाळी सादर होणार आहे. दरम्यान, शालिमार चौकात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचवटीतील संयुक्त शिवजयंती समितीने किल्ला साकारला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वंदन करून पुष्पहार अर्पण केले.

इन्फो-

मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

जुने नाशिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील तरुण-तरुणींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या चित्तथराराक प्रात्यक्षिकांना शिवभक्तांनी दाद देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.

इन्फो

सिडकोत अश्वारुढ पुतळा

मिरणुकीवर बंदी असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिडकोतील सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीने अश्वारुढ पुतळ्याचा देखावा उभारला आहे. हा पुतळा शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

इन्फो

लक्ष्यवेधी देखावा

मखमलाबाद नाका येथे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना शेतीची मशागत आणि शेतीविषयी माहिती देतानाचा देखावा साकारण्याचा आला होता. या देखाव्याला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी येणारे शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना दिसत होते.

===Photopath===

190221\19nsk_36_19022021_13.jpg

===Caption===

शिवभक्तांनी शहरात बाईक रॅलीकाढून शिवजन्मोत्सवातचा जल्लोष साजरा केला. 

Web Title: Maha Aarti on the occasion of Shiva Janmotsavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.