त्र्यंबकेश्वरला महाअवयवदान जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:53 PM2017-09-07T23:53:01+5:302017-09-08T00:10:38+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत त्र्यंबकेश्वर पंचायत समिती, आरोग्य विभाग व नूतन त्र्यंबक विद्यालय यांच्या संयुक्त सहभागातून त्र्यंबकेश्वर शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली बुधवारी (दि. ६) शहरातून काढण्यात आली.
त्र्यंबकेश्वर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत त्र्यंबकेश्वर पंचायत समिती, आरोग्य विभाग व नूतन त्र्यंबक विद्यालय यांच्या संयुक्त सहभागातून त्र्यंबकेश्वर शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली बुधवारी (दि. ६) शहरातून काढण्यात आली.
या रॅलीला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी हिरवा बावटा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. नूतन त्र्यंबक विद्यालयापासून शुभारंभ करून संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, आरोग्य अधिकारी योगेश मोरे, मुख्याध्यापक ए. डी. पवार व शिक्षक वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे म्हणाले की, अवयवदानाची चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांचा सहभाग असला पाहिजे. तालुका आरोग्य अधिकारी योगेश मोरे यांनी रुग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अवयवदानाला महत्त्व आहे.