ं‘माहा’ चक्रीवादळाचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:42 AM2019-11-05T00:42:18+5:302019-11-05T00:43:15+5:30
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याबरोबर मालमत्तेच्या बचावाचे आव्हान उभे राहिले आहे. पालघरमधील शाळांना ६ ते ८ तारखेपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानेदेखील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने राज्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा इशारा देण्यात आल्यामुळे अनेक जिल्ह्यांनी धसका घेतला आहे. विशेषत: शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नसे तसेच पूर आल्यास नदी, नाले ओलांडणे जिकिरीचे ठरू शकते. त्यामुळे आदिवासी बहुल तालुक्यांमधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळांना सुटी देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्याने अद्याप तशी घोषणा केलेली नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन सतर्क बहुतेक जिल्ह्यांनी जवळपास पंचनामे पूर्ण केले असून, दोन दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करून अंतिम नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठविला जाण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे प्रशासन सावरत असतानाच चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आपापल्यापरिने आताच पिकांची काळजी सुरू केली आहे.
‘माहा’ चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि प्रभाग मंत्रालयाने उत्तर महाराष्टÑासह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला सतर्कतेबरोबरच उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.