महा-ई-सेवा केंद्र ग्रामीण भागात आॅफलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:14 PM2020-08-05T23:14:42+5:302020-08-06T01:39:34+5:30
खडकी : ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांची आॅनलाइन सेवा सुरळीत सुरू नसल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी अडथळे येत आहेत. सदर सेवा लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांची आॅनलाइन सेवा सुरळीत सुरू नसल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी अडथळे येत आहेत. सदर सेवा लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी सातबारा खाते उतारा काढावा लागत आहे तसेच शाळा व कॉलेजची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने जातीचे दाखले, उत्पन्न दाखला नॉन क्रीमीलेअरसाठी कागदपत्र काढण्यासाठी शहरात जावे लागत आहे.
मात्र शहरातील गर्दी टाळण्यासाठी लोक उपलब्ध असलेल्या ग्रामीण भागातील सेवा केंद्रावरूनच आपले काम तयार करून घेत आहेत. मात्र सदरची सेवा वेळोवेळी खंडित होत असल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ग्रामीण भागात बºयाच ठिकाणी मोठ्या गावाच्या ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रसेवा केंद्रातील सेवा उपलब्ध आहे. सदर दाखले आॅनलाइन दिल्यानंतर लवकर तयार होत नसल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत आहे. यामुळे सदरची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागात होत आहे.