अत्याधुनिक उपकरणांचा महाकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:42 AM2018-02-17T01:42:10+5:302018-02-17T01:44:28+5:30

फॉर्म्युला स्टुडंट कार, दुचाकीची ऊर्जा वाचवणारी प्रणाली, मटेरियल हॅँडलिंग युनिट, पिझे इलेक्ट्रिक क्रिस्टल, व्हॅन डे ग्राफ जनरेटर, वॉटर इरिगेशन सिस्टीम, व्हॉट्सअ‍ॅप कंट्रोल, होम सिक्युरिटी अशा वैविध्यपूर्ण विज्ञान उपकरणांची मांडणी, प्रत्येक उपकरणाची तितक्याच तन्मयतेने दिली जाणारी माहिती, विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करत आपल्या ज्ञानात भर घालण्यास उत्सुक प्रेक्षक असे विज्ञानमय वातावरण सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात अनुभवयास मिळत आहे.

  Maha Kumbha of the state-of-the-art equipment | अत्याधुनिक उपकरणांचा महाकुंभ

अत्याधुनिक उपकरणांचा महाकुंभ

Next

नाशिक : फॉर्म्युला स्टुडंट कार, दुचाकीची ऊर्जा वाचवणारी प्रणाली, मटेरियल हॅँडलिंग युनिट, पिझे इलेक्ट्रिक क्रिस्टल, व्हॅन डे ग्राफ जनरेटर, वॉटर इरिगेशन सिस्टीम, व्हॉट्सअ‍ॅप कंट्रोल, होम सिक्युरिटी अशा वैविध्यपूर्ण विज्ञान उपकरणांची मांडणी, प्रत्येक उपकरणाची तितक्याच तन्मयतेने दिली जाणारी माहिती, विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करत आपल्या ज्ञानात भर घालण्यास उत्सुक प्रेक्षक असे विज्ञानमय वातावरण सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात अनुभवयास मिळत आहे. निमित्त आहे सुवर्णमहोत्सवी उपक्रमांतर्गत आयोजित ‘आय राईज’ विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचे. शुक्रवारी (दि. १६) सकाळी या विज्ञान प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ झाला असून, १९ फेब्रुवारीपर्यंत ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.  संस्थेच्या अभियांत्रिकी, आर. वाय. के. विज्ञान, एस. एम. आर. के. महिला महाविद्यालय यांच्या विविध विभागांचा सहभाग या प्रदर्शनात आहे. प्रदर्शनात एकाहून एक सरस उपकरणे, यंत्रणा सादर करण्यात आल्या असून, विज्ञानाच्या साहाय्यानेच रोजच्या जीवनात निर्माण झालेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्याचे फॉर्म्युले विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. यातील काही उपकरणांनी निरनिराळी पारितोषिकेही मिळवली असून, घरगुती उपयोगापासून कंपनी, अंतराळयानापर्यंत ठिकठिकाणी वापरता येणाºया उपयुक्त गोष्टी येथे पाहायला मिळत आहेत. 
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मेकॅनिकल शाखेतील तृतीय व चौथ्या वर्षातील २५ विद्यार्थ्यांनी ही कार तयार केली आहे. डिझाइनपासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही देशी असणारी ही कार कॉलेजमध्येच तयार झाली आहे. दिल्ली येथे भरलेल्या ‘सुप्रा’ प्रदर्शनात या मॉडेलने ६३ रॅँकवर मानाचे स्थानही पटकावले आहे.
थम्बो इलेक्ट्रिक जनरेटर
अ‍ॅल्युमिनीअमच्या आठ प्लेट बसवून हे ‘थम्बो इलेक्ट्रिक जनरेटर फॉर एक्झॉस्ट सिस्टीम’ तयार करण्यात आले आहे. यामुळे वाहनातील इंधनावरची पॉवर कमी करून ती बॅटरीला दिली जाते. यातून मोबाइलदेखील चार्ज होऊ शकतो. शिवाय गाडीचे मागचे, पुढचे लाइटही पूर्ण क्षमतेने चालतात. हॅँडल बार हिट करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. यातून पहिल्याच प्रयत्नात १३.५ ते १४ व्होल्टची ऊर्जा मिळविण्यात यश आले आहे. अजय काजळे, आदित्य काकडे, रोहन कुलकर्णी, वैभव भालेराव या चौघांनी हे मॉडेल तयार केले आहे.

 

Web Title:   Maha Kumbha of the state-of-the-art equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक