गडावर सप्तश्रृंगी देवीची महापुजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:18 PM2019-10-01T13:18:25+5:302019-10-01T13:18:35+5:30
पांडाणे - साडेतिनशक्ती पिठापैकी आदयपिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे.
पांडाणे - साडेतिनशक्ती पिठापैकी आदयपिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे.
तिस-या माळेची महापुजा सहाय्यक उपायुक्त दिलीप स्वामी व अँड .अजय निकम यांनी सहकुंटूबकेली. व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत आदी उपस्थित महाआरती करण्यात आली.
आजच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तिसरी असल्यामुळे सप्तशृंगी देवीला हिरवा रंगाचा अकरा वारी शालूने देविचे रूप अधिक खुलून दिसत होते. तिसºया माळेनुसार भगवतीला हिरे मुकूटचा सोन्याचा मुकूट , गळ्यात मोहण माळ , कुहीरी हा , मंगळसुत्र , कर्णफुले, नथ , सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे , सुवर्ण पादुका असे अलंकारांनी भगवतीचे रु प खुप देखणे व खुलून दिसत होते. मंगळवार असल्यामुळे देवीभक्तांच्या संख्येत वाढ होवून चाळीस ते पन्नास हजार भाविक भगवती चरणी लीन होतील असे न्यासाचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी सांगितले.