महामार्गालगत ढाबे बनले मद्यपींचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:21 AM2018-04-29T00:21:36+5:302018-04-29T00:21:36+5:30
मद्यविक्रीची परवानगी असलेले हॉटेल मालक हे शासनाने दिलेल्या वेळेनुसार हॉटेल बंद करीत असले तरी दुसरीकडे मात्र मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर मद्य पिण्याची परवानगी नसतानाही रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना जेवणाबरोबर मद्य पिण्याची परवानगी दिली जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिडको : मद्यविक्रीची परवानगी असलेले हॉटेल मालक हे शासनाने दिलेल्या वेळेनुसार हॉटेल बंद करीत असले तरी दुसरीकडे मात्र मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर मद्य पिण्याची परवानगी नसतानाही रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना जेवणाबरोबर मद्य पिण्याची परवानगी दिली जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाने गेल्यावर्षी महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरातील हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास बंदी घातली होती. ही बंदी उठविली असल्याने परिसरातील हॉटेलमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दुसरीकडे मात्र महामार्गालगतच अनधिकृतरीत्या विनापरवाना बहुतांशी ढाब्यांवर ‘बाहेरून मद्य घेऊन या व जेवणाचा आस्वाद घ्या’ अशी पद्धत सुरूच असल्याने ढाबेच बनले मद्यपींचा अड्डे अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. यातच ढाबे हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने मद्य पिऊन वाद होण्याचे प्रकारही अनेकदा घडत असल्याचे चित्र बघावयास मिळते. शासनाने मद्याचे दर अधिक केल्याने ज्या मद्यपींना बारमध्ये जाऊन मद्य पिणे परवडत नाही असे मद्यपी ढाब्यांवर जाणे पसंत करत असल्याने ढाब्यांवर विनापरवाना मद्य पिण्याची सोय असल्याने हॉटेलमधील गर्दीपेक्षा ढाबे मात्र फुल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य उत्पादक शुक्ल विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या ढाबेमालकांवर कारवाई करीत असले तरी न्यायालयात केस सुरू राहते व दुसरीकडे मात्र ढाबामालक आपला व्यवसाय पुन्हा सुरूच ठेवत असल्याने कायद्याच्या अखत्यारित राहूनच अधिकारी काम करीत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे लाखो रुपयांचा कर भरून अधिकृतपणे मद्यविक्री व पिण्याची मुभा असणाºया हॉटेल मालकांना मात्र वेळेचे बंधन असते. यानंतर हॉटेल सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याने बहुतांशी हॉटेल मालक हे वेळेवरच हॉटेल बंद करीत असल्याचे दिसून येते.
ढाबे संस्कृती वाढत असल्याचे चित्र
महामार्गावरील ढाब्यांवर लेट नाईट जेवणाची सोय, त्यातच बहुतांशी ढाब्यांवर बाहेरून पार्सल (मद्याचे) घेऊन येण्याची व्यवस्था असल्याने दिवसेंदिवस या ढाब्यांवर जेवणासाठी येणाºयांची संख्या वाढत आहे. यातच ढाब्यांवर हॉटेलपेक्षा कमी खर्चात निवांत बसण्याचीही सोय असल्याने ढाबे संस्कृती वाढत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.