नाशिकरोडला शिवसेनेच्या वतीने महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST2018-11-25T00:59:26+5:302018-11-25T01:00:07+5:30
शिवसेनेच्या वतीने मुक्तिधाम व देवळाली गावातील श्रीराम मंदिरात महाआरती करून प्रभू रामचंद्राचा जयजयकार करण्यात आला.

नाशिकरोडला शिवसेनेच्या वतीने महाआरती
नाशिकरोड : शिवसेनेच्या वतीने मुक्तिधाम व देवळाली गावातील श्रीराम मंदिरात महाआरती करून प्रभू रामचंद्राचा जयजयकार करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी व मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अयोध्या येथील शरयू नदीची महाआरती करण्यात आली. याच निमित्ताने शिवसेनेच्या वतीने मुक्तिधाम व देवळाली गावातील श्रीराम मंदिरात शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची महाआरती करण्यात आली. तसेच विहितगाव सौभाग्यनगर येथील मंदिरातदेखील शिवसेनेच्या वतीने आरती करण्यात आली. यावेळी नगरसेविका ज्योती खोले, जयश्री खर्जुल, प्रशांत दिवे, अशोक सातभाई, दिनकर आढाव, योगेश देशमुख, सुनील देवकर, राजू फोकणे, चंद्रकांत विसपुते, नितीन खर्जुल, शाम खोले, रमेश गायकवाड, विक्रम खरोटे, श्रीकांत मगर, विकास गिते, योगेश शिंदे, गिरीश लवटे, नीलेश शिरसाठ, दीपक टावरे आदि उपस्थित होते.