महाबळसुरींचे जीवन प्रेरणादायी

By admin | Published: October 5, 2016 01:51 AM2016-10-05T01:51:19+5:302016-10-05T01:51:37+5:30

गुणानुवाद : आचार्य रत्नसेन सुरीश्वरजी

Mahabalasur's life is inspirational | महाबळसुरींचे जीवन प्रेरणादायी

महाबळसुरींचे जीवन प्रेरणादायी

Next

नाशिक : जैन आचार्य वात्सल्यसिंधू महाबळसुरी म. सा. यांचे पाळीताना येथे महानिर्वाण झाले. त्यांचे जीवन प्रेरणादायी होते. १९६१ साली त्यांनी आपल्या पत्नीसमवेत मुंबईला दीक्षा घेतली होती. अत्यंत शांतमूर्ती व विद्वतेचं शिखर असणारे महाबळसुरी यांचे सान्निध्य म्हणजे नवचैतन्य निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसेन सुरीश्वर म. सा. यांनी केले.
महाबळसुरी म. सा. यांच्या निर्वाणनिमित्त नाशिक येथे भाविक आराधना भवन, टिळकवाडी येथे आयोजित गुणानुवाद सभेत ते बोलत होते. अमावास्याच्या दिवशी ते सर्वांना सोडून गेले हा दिवसदेखील महत्त्वाचा होता. कारण २२ वे तीर्थंकर नेमीनाथ भगवान, २४ वे तीर्थंकर भगवान महावीर हेदेखील अमावास्याच्या दिवशीच गेले. महाबळसुरींच्या निर्वाणाने फार मोठी हानी झाली. त्यांची शिकवण दैनंदिन जीवनात अंमलात आणली पाहिजे. असेही ते म्हणाले. दीक्षा महोत्सव, प्राणप्रतिष्ठा उपधान तप मंदिराची उभारणी आदि अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडले, अशा शब्दात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
यावेळी शैलेशभाई शहा, गौतम सुराणा, महेशभाई शहा, प्रकाश बोथरा यांची त्यांच्या आठवणीपर भाषण झाले. स्तवन झाले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सध्याचे १४00 जैन साधूसंतांचे प्रमुख म्हणून गच्छाधीपती आचार्य भगवंत प. पू. पुण्यपाल सुरीश्वर महाराज हे त्यांचे चिरंजीव असून त्यांची दीक्षा ही वणीमध्ये झालेली आहे. या गुणानुवाद कार्यक्रमप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते. दिवसभर विविध धार्मिक विधीही पार पडले. (प्रतिनिधी)

Web Title: Mahabalasur's life is inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.