मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महाबोधीवृक्ष महोत्सव
By Suyog.joshi | Published: October 24, 2023 09:54 AM2023-10-24T09:54:35+5:302023-10-24T09:55:07+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
नाशिक : त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकाच्या परिसरात विजयादशमीदिनी आज होणाऱ्या महाबोधीवृक्ष फांदी रोपण महोत्सवास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्य हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते दुपारी या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण होणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता महोत्सवाला
सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असून, महोत्सवासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपाध्यक्ष
नरहरी झिरवाळ, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण
मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार असून, नाशिककरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. या साेहळ्यासाठी राज्यभरातील भन्तेगण, धम्म उपासक, उपासिका यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सोमवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
देश-विदेशांतील भिख्यू, उपासकांची उपस्थिती या सोहळ्यासाठी संपूर्ण बुद्ध स्मारक परिसराची सजावट करण्यात आली आहे, तर बौद्धस्तुप आकर्षक रंगसंगतीने उजळून निघाला आहे. या महोत्सवासाठी श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आणि नेपाळ येथील प्रमुख भिख्यू आणि मान्यवरांचे नाशिक येथे आगमण झाले आहे.