महड-बहिराने ग्रामपंचायतीस ग्रामस्थांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:26+5:302021-08-22T04:17:26+5:30
नामपूर : बागलाण तालुक्यातील महड-बहिराने ग्रामपंचायतीस ग्रामस्थांनी ठोकले टाळे ठोकून निषेध व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावावर आर्थिक ...
नामपूर : बागलाण तालुक्यातील महड-बहिराने ग्रामपंचायतीस ग्रामस्थांनी ठोकले टाळे ठोकून निषेध व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासकामात २०-२५ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप करत स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीस ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहे. गेल्या दीड वर्षांपासून येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने गाव विकास आराखड्यातील निधी काम न करता लाटल्याचे उपसरपंच मधुकर सोनवणे यांनी बोलताना सांगितले. सदर बाब गटविकास अधिकारी पंचायत समिती बागलाण यांच्याकडे अपहार झाल्याची वारंवार लेखी तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यासहित निदर्शनास आणूनदेखील अधिकाऱ्यांनी विकासकामांची सखोल चौकशी न करता सरपंच व ग्रामसेवकास यांना पाठीशी घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महड-बहिराने गावात स्मशानभूमीचे कंपाउंड,अंगणवाडी तार कंपाउंड, पिण्याचे पाण्याची पाइपलाइन, बाक खरेदी, टीसीएल पावडर, तणनाशक औषध मारणे, नवीन अंगणवाडी दुरुस्ती आदी कामांत २० ते २५ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासन दरबारी वेळोवेळी भ्रष्टाचार संदर्भात चौकशीची मागणी केली, परंतु गटविकास अधिकारी आदींनी कुठलीही सखोल चौकशी अद्याप केली नसल्याने न्याय न मिळाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले आहे. लवकरात लवकर प्रत्यक्ष येऊन चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा गुलाब अहिरे, नंदू सोनवणे, जिभाऊ सोनवणे, शालिक सोनवणे, राजेंद्र सोनवणे, नानाजी पवार, मिलिंद पवार, मधुकर पवार, हिरामण अहिरे, त्र्यंबक अहिरे, वसंत अहिरे, रघुनाथ सोनवणे, अभिमन सोनवणे, सुरेश पवार, विलास कापडणीस आदींनी दिला आहे.
-------------------
बागलाण तालुक्यातील महड-बहिराने येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकताना ग्रामस्थ. (२१ नामपूर)
210821\21nsk_34_21082021_13.jpg
२१ नामपूर