महाधम्म मेळावा ,महाश्रामणेर शिबिराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:56 AM2018-10-20T00:56:30+5:302018-10-20T00:57:41+5:30

भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने गोल क्लब मैदान येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराची सांगता बुद्ध व भीमगीतांच्या कार्यक्रमांनी करण्यात आली.

 Mahadmachal Melava, Mahashramnarera Camp | महाधम्म मेळावा ,महाश्रामणेर शिबिराची सांगता

महाधम्म मेळावा ,महाश्रामणेर शिबिराची सांगता

Next

सिडको : भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने गोल क्लब मैदान येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराची सांगता बुद्ध व भीमगीतांच्या कार्यक्रमांनी करण्यात आली.  सामाजिक प्रबोधनातून लोकपरिवर्तनाकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने सर्व समाजात प्रचार-प्रसार होण्याकरिता गेल्या मंगळवार, दि.९ ते १८ आॅक्टोबर दरम्यान गोल्फ मैदानात हजारो उपासकाचे भव्य स्वरूपाचे महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराचे आयोजन बी.एम.ए. ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीत गौतम बुद्धांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रमाआई,जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचे जिवंत देखावे सर्वांचे
लक्ष वेधून घेत होते. यावेळी वाहनांवर व फलकांवर शिका, संघटित व्हा,  संघर्ष करा, कर्तृत्वान नसली  तरी चालेल, पण निष्ठेची माणसे हवीत, अशा प्रकारचे डॉ. बाबासोहबांचे संदेश बघायला मिळाले.  याप्रसंगी बीएमए गु्रपचे अध्यक्ष मोहन अढांगळे, वसंतराव नाईक, अर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक रमेश बन्सोड,  राहुल बच्छाव, अशोक गांगुर्डे, नितीन मोरे आदी सहभागी झाले होते. समाजात शांतीचा संदेश देण्याकरिता शहरभर या धम्म  रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोहन अढांगळे यांनी सांगितले.  गोल्फ क्लबपासून त्रिरश्मी लेणीपर्यंत रॅली  महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराच्या समारोपनिमित्त गुरुवारी (दि.१८) गोल्फ क्लब ते त्रिरश्मी लेणीपर्यंत शिस्तबद्द स्वरूपात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली गोल्फ क्लब, मायको सर्कल, संभाजी चौक, दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पवननगर, उत्तमनगर, मोरवाडी, पाथर्डीफाटामार्गे त्रिरश्मी लेणीपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत बुद्ध भीम गीतांच्या गाण्यांनी परिसर दुमदुमला होता.

Web Title:  Mahadmachal Melava, Mahashramnarera Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.