महिला वाहकाशी अरेरावी तरुणाला पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:56 PM2017-11-25T15:56:47+5:302017-11-25T15:57:35+5:30
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या बस महिला वाहकासोबत अरेराव व गैरवर्तन करणाºया बेशिस्त तरुणावर दामिनी पथकाकडून घटनास्थळावर उठाबशा काढण्याची कारवाई करण्यात आली.
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या बस महिला वाहकासोबत अरेराव व गैरवर्तन करणाºया बेशिस्त तरुणावर दामिनी पथकाकडून घटनास्थळावर उठाबशा काढण्याची कारवाई करण्यात आली. महिला वाहकाची माफी मागण्यासोबतच उठबशा काढण्याच्या शिक्षेमुळे बेशिस्त तरुण व प्रवाशांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नाशिककडून श्रीरामपूरकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये नाशिकरोड बसस्थानकातून काही प्रवाशी बसले. एस. टी. च्या महिला वाहक ए.जे बर्डे यांनी प्रवाशांचे तिकीटे काढण्यास सुरूवात केली. सर्व प्रवाशांचे तिकीट काढल्यानंतर एका प्रवाशाने तिकीट काढले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बर्डे यांनी वारंवार सूचना करून तिकीट काढण्यास सांगितले. मात्र, कोणीही स्वत:हून पुढे येत नसल्याने त्यांनी तिकीट तपासणीस सुरूवात केली. बसमधील एका तरुणाकडे तिकीट नसल्याचे वाहक बर्डे यांच्या लक्षात आले. त्यास जाब विचारला असता त्याने बर्डे यांना अर्वाच्च भाषा वापरण्यास सुरूवात केली. महिला वाहकासोबतचे गैरवर्तन पाहून बसमधील इतर प्रवाशांनी संतप्त होत बेशिस्त युवकाला बसमध्ये चोप दिला. सदरची माहिती दामिनी पथकाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच दामिनी पथकाच्या पालीस उपनिरिक्षक संगिता गिरी, पोलिस नाईक टी. के भोये, सरला गांगवे, व्ही.एस म्हसदे, राहूल निरगुडे, इंगळे आदि सिन्नर बसस्थानकात दाखल झाले. संबंधीत प्रवाशाला लोकांसमोरच उठबशा काढल्यास लावल्यानंतर संबंधीतांवर पोलीस ठाण्यता नेऊन कारवाई करण्यात आली.