महिलांनी थांबवावा ‘छळा’च्या कायद्याचा दुरुपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:53 AM2017-07-29T01:53:19+5:302017-07-29T01:53:19+5:30
मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला विवाहित पुरुष मंडळींच्या बाबतीत थोडी घ्यायला लावलेली नरमाईची भूमिका अत्यंत योग्य असून, अत्याचाराच्या नावाखाली ४९८च्या खोट्या केसेस दाखल करीत पुरुषांचा मानसिक छळ करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांना अंतर्मुख करायला लावणाºया निरीक्षणाचे स्वागत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला विवाहित पुरुष मंडळींच्या बाबतीत थोडी घ्यायला लावलेली नरमाईची भूमिका अत्यंत योग्य असून, अत्याचाराच्या नावाखाली ४९८च्या खोट्या केसेस दाखल करीत पुरुषांचा मानसिक छळ करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांना अंतर्मुख करायला लावणाºया निरीक्षणाचे स्वागत करण्यात आले आहे. पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मात्र कायद्याचा दुरुपयोग करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांनाही शासन केले जावे, त्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केलेली पुरुषांच्या बाजूने ४९८-ब कलम लवकरात लवकर लागू करावे, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे. विवाहीतेचा छळ झाल्यास ती सासरच्या व्यक्तींविरूध्द पोलीसात ४९८ अ अन्वये छळाविरुद्ध तक्रार करते. मात्र, त्याचा दुरुपयोग होत असल्याचे मत व्यक्त करीत सर्वाेच्च न्यायालयाने अशाप्रकारच्या छळाची तक्रार आल्यानंतर चौकशीअंतीच त्याची नोंद घ्यावी, असे सूचित केले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, वकील, पोलीस, नागरिक यांच्याशी संवाद साधला असता स्त्री-पुरुष समानतेचे पालन केले जावे व दोषीला शासन तर निर्दोष व्यक्तीला दिलासा मिळावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. पत्नीच्या दैनंदिन खर्चासाठी पोटगी देण्याचा तत्काळ आदेश देण्यात येऊ नये ही न्यायालयाने केलेली मागणीही योग्य असल्याचेही मत पुढे येत आहे.