महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:38 PM2019-04-01T17:38:06+5:302019-04-01T17:38:12+5:30

नाशिक : महाजन बंधू फाउण्डेशनतर्फे आयोजित ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेला रविवारी मुंबईतून उत्साहात सुरु वात झाली. समुद्र ते आकाश असा महाजन बंधूंचा प्रवास आहे.

 Mahajan brothers started on a se wheelchair campaign | महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरु वात

महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरु वात

Next
ठळक मुद्देनाशिक येथे पाथर्डी फाटा येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.



नाशिक : महाजन बंधू फाउण्डेशनतर्फे आयोजित ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेला रविवारी (दि. ३१) मुंबईतून उत्साहात सुरु वात झाली. समुद्र ते आकाश असा महाजन बंधूंचा प्रवास आहे.
मुंबईत गेट वे आॅफ इंडिया येथून या प्रवासाला प्रारंभ झाला. ते काठमांडूपर्यंत सायकलवर जाणार आहेत. काठमांडू ते एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करणार आहेत. पुढे एव्हरेस्ट शिखरापर्यंत गिर्यारोहण करणार आहेत.
मुंबईत गेट वे आॅफ इंडिया येथे सकाळी साडेसहा वाजता महाजन बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी  हरीश बैजल,  डॉ. दीपा केन,   डॉ. नवीन मल्होत्रा, उदय निरगुडकर,   डॉ. बाळाभास्कर आदी उपस्थित होते. नाशिक येथे पाथर्डी फाटा येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथून त्र्यंबक रोड येथील बीएलव्हीडी हॉटेलपर्यंत नाशिक सायकलिस्टने डॉ. महाजन बंधूंसोबत राइड केली. येथे सीपीआर ट्रेनिंगचे प्रात्यक्षिक केल्यानंतर साहसवीर धुळे शहराकडे रवाना झाले. यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, डॉ. मनीषा रौंदळ, तसेच सायकलिस्ट सदस्य उपस्थित होते. दिवंगत क्र ीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्माराज बाम आणि नाशिकचा सायकलप्रेमी दिवंगत जसपालसिंग विर्दी यांना समर्पित असणाऱ्या या मोहिमेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत असावी या उद्देशाने सीपीआर तंत्राविषयी जनजागृती करणे - जीवन संजीवनी उपक्र माअंतर्गत प्रत्येक मनुष्याला जीवन वाचविण्यासाठी सज्ज प्रशिक्षित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

---.(01महाजन सायकल)कॅप्शन रविवारी (दि.३१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे नाशिक येथे पाथर्र्डी फाटा येथे सायकलप्रेमींतर्फे स्वागत करण्यात आले.

Web Title:  Mahajan brothers started on a se wheelchair campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.