बालमनावरील संस्कार चिरकाल टिकतात महाजन : मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:58 AM2017-12-02T00:58:21+5:302017-12-02T00:59:08+5:30

पहिलीपासून विद्यार्थी शिकत असताना इतर विषयांबरोबरच मूल्यशिक्षणासारखा विषय त्याला शिकवला गेला तर ते संस्कार चिरकाल टिकतात.

Mahajan: The value-added stimulus ceremony is celebrated in Balmana | बालमनावरील संस्कार चिरकाल टिकतात महाजन : मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळा

बालमनावरील संस्कार चिरकाल टिकतात महाजन : मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देमुथा फाउंडेशनच्या वतीने आयोजन मूल्यवर्धनाची मोलाची भूमिका

नाशिक : पहिलीपासून विद्यार्थी शिकत असताना इतर विषयांबरोबरच मूल्यशिक्षणासारखा विषय त्याला शिकवला गेला तर ते संस्कार चिरकाल टिकतात. यातून सुदृढ व सुसंस्कारित पिढी घडू शकेल जी देशाचे नाव उज्ज्वल करणारी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. शंकराचार्य संकुल येथे मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्टÑ शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, आदर्श, सुशिक्षित, सुसंस्कृत पिढी घडवायची असेल तर मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. जगाच्या पाठीवर आपला देश महाशक्ती म्हणून सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असून, यात मूल्यवर्धनाची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी व त्यांना शिकविणारे शिक्षक यांनी मूल्यशिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे, आदर्श वर्तन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतिन पगार, शिवाजी अहिरे, सुशील दराडे, किशोर साखला, प्रतापमल बाफणा, सतीश डुंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. नंदकिशोर साखला यांनी प्रास्तविक केले. घोटीचे केंद्रप्रमुख अकबर शेख यांनी मूल्यवर्धन अभ्यासक्रम व त्याच्या अंमलबजावणीमुळे होणारे परिणाम याविषयीचे अनुभव सांगितले. प्रफुल्ल पारख यांनी सूत्रसंचालन केले. मूल्यशिक्षण विषयाचे महत्त्व विशद करणारी ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

Web Title: Mahajan: The value-added stimulus ceremony is celebrated in Balmana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक