महाले खून प्रकरणातील दोघांना आजन्म जन्मठेप

By admin | Published: March 4, 2017 01:40 AM2017-03-04T01:40:57+5:302017-03-04T01:41:12+5:30

नाशिक : एकाचा खून, तर दुसऱ्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी प्रभात आढाव (२७) व अनिल यादव दोघांनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱआऱवैष्णव यांनी आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली़

Mahale murder case: | महाले खून प्रकरणातील दोघांना आजन्म जन्मठेप

महाले खून प्रकरणातील दोघांना आजन्म जन्मठेप

Next

 नाशिक : ग्रुपमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरून झालेले भांडण मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलेल्या दोघांपैकी एकाचा खून, तर दुसऱ्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी प्रभात रमेश आढाव (२७) व अनिल जगन्नाथ यादव (२६, दोघेही रा़उपेंद्रनगर, सिडको) दोघांनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱआऱवैष्णव यांनी शुक्रवारी (दि़३) आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ उपेंद्रनगरच्या मैदानात २००९ मध्ये ही घटना घडली होती़
उपेंद्रनगरमधील आरोपी प्रभात आढावच्या (पीए) ग्रुपमध्ये सामील होत नसल्याच्या कारणावरून योगेश भाऊलाल महाले (१७) व दिनेश राजाराम पाटील (१८) यांच्यासोबत वाद होते़ ३ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास महाले व पाटील गिरणार स्वीटजवळ बसले होते़ आरोपी प्रभातने फोन करून मागील भांडण मिटविण्यासाठी योगेश व दिनेशला उपेंद्रनगरच्या मैदानावर बोलावले़ बॉबी नावाच्या मित्राच्या दुचाकीवरून हे दोघे मैदानावर गेले़ उपेंद्रनगरच्या मैदानावर दबा धरुन बसलेले आरोपी प्रभात आढाव, अनिल यादव व आणखी एक अल्पवयीन असे तिघे हातात चाकू घेऊन पळत आले़ यापैकी आरोपी प्रभातने योगेशवर, तर अनिल यादवने दिनेशवर चाकूने सपासप वार केले़ यामध्ये वर्मी घाव लागल्याने योगेश महालेचा जागीत मृत्यू, तर दिनेश पाटील गंभीर जखमी झाला़ या हल्ल्यादरम्यान अल्वयीन संशयिताने या दोघांनी धरून ठेवण्याचे काम केले़ या दरम्यान, जखमींचे मित्र संदीप घुसळे, विजय सोनवणे व बॉबी हे मैदानावर पोहोचले़ त्यांनी मयत योगेशला जिल्हा रुग्णालयात, तर दिनेशला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले़या प्रकरणी दिनेश पाटीलच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी तिघांविरूद्ध खून व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला़या खटल्यामध्ये सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी दहा साक्षीदार तपासले़ त्यामध्ये जखमी विजय सोनवणे, प्रत्यक्षदर्शी विजय सोनवणे यांची साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला़ न्यायाधीश वैष्णव यांनी खुनाच्या गुन्ह्यात या दोघांना आजन्म जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, तर खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या दोन्ही शिक्षा एकत्रित (कन्करंट) भोगावयाच्या असल्याचे निकालात म्हटले आहे़ या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांनी केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Mahale murder case:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.