म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:00 PM2020-08-13T18:00:27+5:302020-08-13T18:04:24+5:30
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हांळूगी नदीला गेल्या दोन दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळूंगी नदी दुथडी भरुन वाहत आहे .
ठळक मुद्देठाणगाव: भोजापूर धरणात पाणीसाठ्यात वाढ
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हांळूगी नदीला गेल्या दोन दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळूंगी नदी दुथडी भरुन वाहत आहे .
निम्मा पावसाळा संपत आला तरी ठाणगाव परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. पण गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामूळे म्हाळूंगी नदीला महापूर आला आहे. म्हांळूगी नदीच्या उगम खो-यात चांगला पाऊस झाल्याने नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे .
या नदीमूळे भोजापूर धरणात पाणी साठ्यात वाढीसाठी मदत होणार आहे म्हाळुंगी नदीला आलेल्या महापुरामूळे परिसरातील अनेक गावाना लाभ होणार आहे. म्हाळूंगी नदीला महापूर आला असून उंबरदरी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.