नाशिकमध्ये ७ जानेवारीला रंगणार महामॅरेथॉनचा थरार, लवकर सहभागी होण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:25 PM2023-12-27T17:25:24+5:302023-12-27T17:27:54+5:30

सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात 'लोकमत'ने यशाची अनेक शिखरे याआधीच पादाक्रांत केली आहेत.

Mahamarathon to be held on January 7 in Nashik, call for early participation | नाशिकमध्ये ७ जानेवारीला रंगणार महामॅरेथॉनचा थरार, लवकर सहभागी होण्याचे आवाहन

नाशिकमध्ये ७ जानेवारीला रंगणार महामॅरेथॉनचा थरार, लवकर सहभागी होण्याचे आवाहन

नाशिकः धावपटू आणि नागरिक नेहमीच लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आतुर असतात. यंदा लोकमत नाशिक महामॅरेथॉनचा थरार ७ जानेवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार आहे. असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अॅण्ड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झालेली ही महामॅरेथॉन नागरिक व धावपटूंसाठी एक मोठी पर्वणी आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंसाठी पुन्हा एकदा 'कर दे धमाल' करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 

सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात 'लोकमत'ने यशाची अनेक शिखरे याआधीच पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने लोकमत समूहातर्फे दरवर्षी महामॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा महामॅरेथॉनचे हे सातवे पर्व आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षीप्रमाणे यंदाही सहा ठिकाणी लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी धावपटूंना मिळत आहे.

७ जानेवारी रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक वर्षभरापासून विविध मैदानांवर कसून सरावाला लागले आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारे टोकियो, लंडन, न्यूयॉर्क मॅरेथॉनला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची प्रतिक्रिया सहभागी धावपटूंत नेहमीच असते. 

ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार

७ जानेवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सुरू होणाऱ्या लोकमत समूहाच्या महामॅरेथॉनमध्ये ५० च्या ग्रुपने रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ग्रुपने रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्यांनी ९९२२३६९०२८ किंवा ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

१२ लाखांपर्यंत पारितोषिके

> महामॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके

> ३ आणि ५ कि. मी. मधील स्पर्धकांना मिळणार मेडल

> यंदा होणारी महामॅरेथॉन ३, ५, १० आणि २१ कि.मी. अंतरात होणार आहे.

Web Title: Mahamarathon to be held on January 7 in Nashik, call for early participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.