महंत गिरिजानंद सरस्वती अयोध्येस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:50 PM2020-08-02T18:50:39+5:302020-08-02T18:51:42+5:30

त्र्यंबकेश्वर : श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा यांना आलेल्या निमंत्रणानुसार त्यांचे प्रतिनिधी म्हणून महंत गिरिजानंद सरस्वती यांनी ब्रम्हगिरीवरु न गोदावरीच्या उगमस्थानाचे जल व पवित्र तीर्थराज कुशावर्ताचे जल यांचे कलश भरु न अयोध्या येथे रवाना झाले.

Mahant Girijanand Saraswati left for Ayodhya | महंत गिरिजानंद सरस्वती अयोध्येस रवाना

महंत गिरिजानंद सरस्वती अयोध्येस रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देमहंत शंकरानंद सरस्वती यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई

त्र्यंबकेश्वर : श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा यांना आलेल्या निमंत्रणानुसार त्यांचे प्रतिनिधी म्हणून महंत गिरिजानंद सरस्वती यांनी ब्रम्हगिरीवरु न गोदावरीच्या उगमस्थानाचे जल व पवित्र तीर्थराज कुशावर्ताचे जल यांचे कलश भरु न अयोध्या येथे रवाना झाले.
महंत शंकरानंद सरस्वती यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केल्यामुळे ऐनवेळेस त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून महंत गिरिजानंद सरस्वती यांना पाठवण्यात आले आहे. यावेळेस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे येथील दहाही अखाड्याचे साधु-महंत उपस्थित होते. यासमारंभा वेळी भगवान श्रीरामाचा जयजयकारने आसमंत दणाणून गेला होता. हर हर महादेव शंभो हर असा जय जय कार करण्यात आला. गिरिजानंद सरस्वती हे शंभो पंच दशनाम आनंद अखाड्याचे पंच परमेश्वर आहेत. यावेळी त्र्यंबकेश्वर षडदर्शन अखाडा परिषदेचे आजीवन अध्यक्ष सागरानंद सरस्वती, आनंद अखाड्याचे महासचिव महंत शंकरानंद सरस्वती, श्रीपंच
दशनाम जुना अखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज, सहजानंद सरस्वती आदी उपस्थित होते.
(फोटो :02टीबीके3)

Web Title: Mahant Girijanand Saraswati left for Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.