महंत कल्पवृक्षिगरी, सुशीलिगरी महाराज समाधिस्थ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 03:44 PM2020-04-19T15:44:31+5:302020-04-19T15:46:34+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीमौनीबाबा मठाचे ब्रम्हलिन कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली अखाड्याच्या नियमानुसार समाधीस्थ करण्यात आले. तर चालक निलेश तेलवडे यांचा अंत्यविधी कांदीवली येथे करण्यात आला.

Mahant Kalpavshigiri, Sushiligari Maharaj's tomb! | महंत कल्पवृक्षिगरी, सुशीलिगरी महाराज समाधिस्थ !

कल्पवृक्षगिरी महाराज

Next
ठळक मुद्देगडचिंचले गावातीलजमावानेचोर असल्याच्या अफवेने ठार मारले

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीमौनीबाबा मठाचे ब्रम्हलिन कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली अखाड्याच्या नियमानुसार समाधीस्थ करण्यात आले. तर चालक निलेश तेलवडे यांचा अंत्यविधी कांदीवली येथे करण्यात आला.
कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज, त्यांचे कांदीवली स्थित शिष्य सुशीलिगरी महाराज व कार चालक निलेश तेलवडे हे तिघे महाराजांच्या शिष्याच्या अंत्यविधीसाठी सुरत येथे जात असतांना गडचिंचले गावातील सुमारे १०० ते १२५ युवकांनी चोर असल्याच्या अफवेने लाठ्या-काठ्यांनी जवळील हत्यारांनी जीवे ठार मारले. दरम्यान रात्री उशीराने साधारण रात्री साडेअकरा वाजता कल्पवृक्षगिरी जुना अखाड्याशी संबंधीत असल्याने त्यांचा दफनविधी समाधी देउन करण्यात आला.
प्रतिक्रि या ....
या हत्येची सखोल चौकशी व्हावी. या अत्यंत निंदनीय घटनेचा निषेध करतो. गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.
- श्रीमहंत नरेन्द्रगिरी महाराज, अध्यक्ष अ. भा. अखाडा परिषद, हनुमान गढी वाराणसी.

आपल्या धार्मिक कार्यक्र मासाठीही जाणेही संत महात्म्यांनी सोडायचे काय? ही बाब तर सर्वच साधु महात्मांना देखील धोकादायक ठरु शकते. पोलीस असुनही काहीच करु शकले नाही ही शरमेची बाब आहे. किमान त्यांनी लोकांना सांगणे गरजेचे होते.
- श्रीमहंत हरीगिरी महाराज आंतरराष्ट्रीय महासचिव अ. भा. अखाडा परिषद हरिद्वार.

या दुर्दैवी घटनेची चौकशी निस्पृह पणे होणे गरजेचे आहे. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली असुन साधु महात्मा पोलीसांच्या आधाराने जात असतांना अश्ी घटना घडावी त्याचे आश्चर्य वाटते. या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी, व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.
- स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष त्र्यंबकेश्वर षङदर्शन अखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर. (फोटो १९ कल्पकगिरी, १९सुशिलगिरी)

Web Title: Mahant Kalpavshigiri, Sushiligari Maharaj's tomb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.