महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:49+5:302020-12-07T04:09:49+5:30
मालेगाव : संगमेश्वरातील माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सेवानिवृत्त उपायुक्त अशोक कापडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
मालेगाव : संगमेश्वरातील माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सेवानिवृत्त उपायुक्त अशोक कापडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कापडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बुधाजी सोनवणे, लालचंद पांडे, पंढरीनाथ नायेकर, गोटू जोशी, रवींद्र गुरव, तन्मय पगारे उपस्थित होते. दिनेश सोनवणे यांनी आभार मानले.
केबीएच विद्यालय, शेरूळ
मालेगाव : तालुक्यातील शेरूळ येथील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. मिसर होते. अशोक जाधव यांनी प्रतिमापूजन केले. प्रा. वाय. एस. ठोके यांनी मार्गदर्शन केले. डी. एस. वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. एस. जे. बच्छाव यांनी आभार मानले.
मसगा महाविद्यालय
मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. दिनेश शिरूडे यांनी प्रतिमापूजन केले. प्रा. रमेश निकम यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन योगेश शास्री यांनी केले. कार्यक्रमास डॉ. सी. एम. निकम, डॉ. के. एस. अहिरे, आर. एस. शेलार, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.
सेवा इंग्लिश स्कूल, खाकुर्डी
मालेगाव : तालुक्यातील खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूलमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. जी. अहिरे होते. त्यांनी प्रतिमापूजन केले. पी. जी. उशिरे, डी, जी. पाटील, पी. पी. भदाणे, मुख्याध्यापक अहिरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन व्ही. व्ही. कांबळे यांनी केले. तर आभार डी. बी. काकळीज यांनी मानले.
एसपीएच विद्यालय
मालेगाव : येथील एसपीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी एस. वाय. कोकणी होते. मुख्याध्यापक एस. यू. निकम व पर्यवेक्षक एस. व्ही. पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. वाय. आर. अहिरे व एस. व्ही. शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती साळुंके यांनी केले. आभार श्रीमती मेधने यांनी मानले.
जनता विद्यालय, सौंदाणे
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालयात अध्यक्षस्थानी कलाशिक्षक पी. पी. ब्राहीकर होते. प्राचार्य वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्ही. एस. हाके, टी. वाय. पगार, पी. पी. ब्राहीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
मराठी अध्यापक विद्यालय, कॅम्प
मालेगाव : कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्ही. व्ही. मगरे, आर. आर. आहिरे, प्राचार्य सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. कविता पाटील यांनी केले. सी. व्ही. अहिरे यांनी आभार मानले.