नैताळेत मतोबा महाराजांची महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 08:45 PM2021-01-28T20:45:05+5:302021-01-29T00:37:18+5:30
निफाड : नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची महापूजा व रथपूजा गुरूवारी (दि.२८) करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व स्वर्गीय शंकर केसु खलाटे यांचे वारसदार कुटुंब यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले.
निफाड : नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची महापूजा व रथपूजा गुरूवारी (दि.२८) करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व स्वर्गीय शंकर केसु खलाटे यांचे वारसदार कुटुंब यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा नैताळे येथे पौष पौर्णिमेपासून अखंड १५ ते २० दिवस चालणारा श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव भरविण्यात आला नाही. मात्र श्री मतोबा महाराजांची महापूजा व रथ पूजा असा धार्मिक कार्यक्रम श्री मतोबा महाराज देवस्थानने आयोजित केला होता. यावेळी श्री मतोबा महाराजांची महापूजा करण्यात आली. यावेळी व्ही.एन. नाईक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, लासलगाव बाजार समितीच्या उपसभापती प्रीती बोरगुडे, संचालक वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, जिल्हा परिषेदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल, निफाडचे नगरसेवक दिलीप कापसे, विलास मत्सागर, उत्तम जाधव, महेश चोरडिया, भीमराज काळे, संदीप गारे, संजय घायाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्याक्ष भूषण धनवटे,मोहन खताळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचा श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे यांनी सत्कार केला.
खलाटे बंधूंकडून जागा दान
महापूजेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी विठ्ठल खलाटे, रामभाऊ खलाटे, लक्ष्मण खलाटे, गंगाराम खलाटे, जगदीश खलाटे या खलाटे बंधूनी आपली मंदिराशेजारी असलेली जागा श्री मतोबा महाराज देवस्थानला दान केली आहे. तशी घोषणा महापूजेप्रसंगी करण्यात आली.
लाडूच्या प्रसादाचे वाटप
गुरुवारी पौष पौर्णिमेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद देवस्थानच्या वतीने वितरीत करण्यात आला. श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव बंद असला तरी भाविकांनी दर्शनास येताना सोशल डिस्टन्स ठेवावा व मास्क वापरावा, असे आवाहन श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट वतीने करण्यात आले आहे