महाराजा श्री अग्रसेन जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:30 AM2019-09-30T00:30:12+5:302019-09-30T00:30:44+5:30
समाजवाद, अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. काठेगल्ली येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे जयंतीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २९) संध्याकाळी पार पडला. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली.
नाशिक : समाजवाद, अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. काठेगल्ली येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे जयंतीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २९) संध्याकाळी पार पडला. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली.
अग्रवाल सभा, नाशिकतर्फे महाराजा अग्रसेन यांच्या जन्मोत्सवानिमित्त रविवार कारंजा येथे प्रतिमेचे पूजन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार, नगरसेवक गुरुमित बग्गा, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष उमेश मुंदडा, आर्कि. सुरेश गुप्ता, राधेश्याम गुप्ता, अंकित अग्रवाल, मनीष अग्रवाल, शशी अग्रवाल, सपना अग्रवाल उपस्थित होते. आडगावच्या बालासुंंदरी माता मंदिरात श्रीपाल अग्रवाल यांच्या हस्ते, तर महात्मानगर येथे राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माल्यार्पण केले. अग्रसेन भवनमध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इमामी कंपनीचे उपाध्यक्ष दिलीप पोद्दार, सिन्नरच्या क्युपिड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ओमप्रकाश गर्ग उपस्थित होते. समाजाबरोबरच शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे यावेळी गर्ग यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी पोद्दार, युवा अध्यक्ष अंशुल अग्रवाल, ताराचंद गुप्ता आदी उपस्थित होते. सभेतर्फे विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. स्वागत संयोजक दुर्गेश गर्ग, रवींद्र केडिया यांनी केले. आभार महामंत्री विमल सराफ यांनी मानले. याप्रसंगी सोमबाबू अग्रवाल, श्याम ढेडिया, भगवानदास अग्रवाल, महेश सत्यप्रकाश आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘अग्रभागवत’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला मंडळाच्या वतीने पूर्वसंध्येला उज्ज्वल अग्रवाल यांचे अग्रभागवत पठण या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी समाजबांधवांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला. कलाकारांनी नृत्यनाटिकेतून महाराजा अग्रसेन यांचा जीवनप्रसंग मांडला. यशस्वीतेसाठी शशी दिनेश अग्रवाल, नीरा अग्रवाल, संगीता अग्रवाल, ऋचिका चांद आदी प्रयत्नशील होते.
यांचा झाला गौरव
अग्रसेन विश्वस्त ट्रस्टतर्फे विविध विद्याशाखेतील मंजूषा पुरंदरे, ओमकार हांडे, अनिकेत गायकवाड, शांती सिंग, गौरव साळुंखे, शैली मौर्य, मोनाली पांजणकर, श्रुतिका अग्रवाल आदी गुणवंतांना गौरविण्यात आले.