पेठ येथे महाराजस्व अभियान

By admin | Published: December 30, 2016 11:35 PM2016-12-30T23:35:18+5:302016-12-30T23:35:50+5:30

शिबिर : शासकीय योजने अंतर्गत लाभार्थींना विविध साहित्यांचे वाटप

Maharajash campaign at Peth | पेठ येथे महाराजस्व अभियान

पेठ येथे महाराजस्व अभियान

Next

पेठ : महाराष्ट्र शासन महसूल विभाग व तहसील कार्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तातुकास्तरीय समाधान शिबिर आमदार नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.  तहसीलदार हरीश भामरे यांनी प्रास्ताविकात शासनाच्या राजस्व अभियानाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. यावेळी तालुक्यातील लाभार्थींना दुय्यम शिधापत्रिका, शालेय विद्यार्थ्यांना अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना मंजुरी आदेश, उज्ज्वल गॅस योजने अंतर्गत पात्र लाभार्थी ग्राहक कार्ड, आधार कार्ड नोंदणी पावत्या, तालुका कृषी विभागांतर्गत जैविक औषधांचे वाटप, परसबाग भाजीपाला-बियाणे वाटप, आंबा मोहरसंरक्षण घडी पत्रिका प्रकाशन, पेसाअंतर्गत प्राथमिक शाळांना प्रोजेक्टर व संगणक, सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, विज्ञान प्रदर्शन व आयएसओ प्रमाणपत्र वाटप, आदिवासी उपयोजनांतर्गत आॅइल इंजिन व बळीनांगर वाटप, पशुसंवर्धन विभागामार्फत गोमाशी-गोचीड निर्मूलन औषध व स्वच्छ दूध निर्मिती भांडी व मका बियाणे वाटप, वन विभागाचे सामूहिक वनहक्क दावा प्रमाणपत्र, भूमिअभिलेख गट क्रमांक दाखले वाटप, मानव विकास कार्यक्रमांतर्गत माध्यमिक शाळांना सायकल वाटप, अडथळा शर्यतीत विभागीय पातळीवर विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व प्रमाणपत्रांचे वाटप, स्वच्छ भारत अभियानांतर्गत पेठ नगरपंचायतीमार्फत वैयक्तिक शौचालय कार्यारंभ आदेश, पंचायत समितीमार्फत शौचालय प्रोत्साहन अनुदान लाभार्थींना वाटप करण्यात आले.  या प्रसंगी खासदार हरिश्चंंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बागटे, जि. प. शिक्षण समिती सदस्य भास्कर गावित, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर, नगराध्यक्ष लता सातपुते, जिल्हा बँक संचालक नामदेव हलकंदर, डॉ. प्रशांत भदाणे, नगरपंचायत गटनेते भागवत पाटील, नगरसेवक संतोष डोमे, प्रतिभा पाटील, चेतन निखळ, सुनीता चौधरी, भाग्यश्री शिरसाठ, मनोहर चौधरी, रघुनाथ चौधरी, तहसीलदार हरीश भामरे, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, नायब तहसीलदार एच. एन. झिरवाळ, तालुका कृषी अधिकारी शीलानाथ पवार, गटशिक्षणाधिकारी के. बी. माळवाळ, नगरपंचायत मुख्याधिकारी रवींद्र लांडे, प्राचार्य ए. एम. बागुल, पुरवठा निरीक्षक सी. एम. जाधव, डॉ. कविता पाटील, उपविभागीय अधिकारी पी. पी. कुमावत, नायब तहसीलदार श्रीमती गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशांत पाडवी, विस्तार अधिकारी पी. सी. पाडवी, बी. एस. पवार, आर. आर. बोडके यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तंत्रस्नेही शिक्षकांसह लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शीलानाथ पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)






 

Web Title: Maharajash campaign at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.