माळेगाव औद्योगिक वसाहतीत महारॅली
By admin | Published: March 7, 2017 11:06 PM2017-03-07T23:06:36+5:302017-03-07T23:06:57+5:30
सिन्नर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून माळेगाव औद्योगिक वसाहतीत औद्योगिक सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी महारॅली काढण्यात आली.
सिन्नर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून माळेगाव औद्योगिक वसाहतीत औद्योगिक सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी महारॅली काढण्यात आली. या महारॅलीत सिन्नरसह सातपूर, अंबड व इगतपुरी येथील सुमारे पाच हजार कामगार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय परस्पर प्रतिसाद गट (मार्ग) व सिन्नर निमा हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने या औद्योगिक सुरक्षा महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक मधुकर प्रभावळे, उपसंचालक राम दहिफळे, डी.आर. खिरोडकर, अंजली आडे, निमाचे अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, निमाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारे, शशी जाधव, शिवाजी आव्हाड यांच्या उपस्थितीत औद्योगिक सुरक्षा रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रॅली प्रारंभ होण्यापूर्वी भानसी महाराज यांनी सुरक्षेवर कीर्तन व जागर सादर केला. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी जनरल मिलचे विशाल कुलकर्णी, इलेक्ट्रानिकचे राहुल शुक्ल, देशपांडे, हिंदुस्तान युनिलिव्हरचे वसंत मुंडे, जीव्हीएसचे पवन मगजी, केएसबी पंपचे खेले, जिंदाल सॉचे तारे, फूड्स इनचे विजय जोशी यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)