त्रिंगलवाडी किल्ल्यावर महाराणा प्रताप जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 09:22 PM2021-05-09T21:22:00+5:302021-05-10T01:02:13+5:30
घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

तालुक्यातील गिर्यारोहक टीम तथा कळसूबाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती किल्ल्यावर साधेपणाने जयंती साजरी केली. यावेळी प्रतिमेचे पूजन करून महाराणा प्रताप यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला व पराक्रमाला उजाळा देण्यात आला.
या जयंती सोहळ्यात कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, काळू भोर, बाळू आरोटे, डॉ. महेंद्र आडोळे, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण, सुरेश चव्हाण, उमेश दिवाकर, भाऊसाहेब जोशी, नगमा खलिफा, जानवी भोर, चतुर्थी तोकडे, प्रणव खिंवसरा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.