महाराष्टÑ-गुजरात सीमेवर कोरोना चेक पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 08:53 PM2020-03-26T20:53:39+5:302020-03-26T23:09:00+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यात चार ठिकाणी ‘कोरोना चेक पोस्ट’ उभारण्यात आला आहे.

Maharashtra 4- Corona Check Post on Gujarat border | महाराष्टÑ-गुजरात सीमेवर कोरोना चेक पोस्ट

कातरवेल येथील चेकपोस्टची पाहणी करताना बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील. समवेत कर्मचारी.

Next

सटाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यात चार ठिकाणी ‘कोरोना चेक पोस्ट’ उभारण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रतिबंध असलेल्या देशातून प्रवास केलेल्या तसेच मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद व कोरोनाबाधित शहरातून प्रवास केलेल्या व ज्यांना घरीच विलगीकरण करण्यात आले होते, अशा व्यक्तींना सर्दी, खोकला, घशाचा त्रास आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी बागलाणच्या चार ठिकाणच्या सीमारेषांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. मानूर, बाभुळणे, कातरवेल, चिराई घाट येथील चेक पोस्टवर आरोग्यसेवक आर. डी. हिरे, जी. एम. बच्छाव, एस. एन. खैरनार, वाय. आर. मेश्राम, सी. एस. चव्हाण, एस. सी. तिडके, एस. एम. वाघ, ए. ए. मोरे, प्रकाश शिंदे, पी. सी. मोरे, ई. डी. कुवर, पी. झेड. पवार, गौतम केदारे, आर. व्ही. खैरनार, पी. ए. राऊत, डी. टी. साळवे, कुंदन गावित आदींची पथक तैनात करण्यात आली आहेत. चार पथके नियुक्त केले असून, ते चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. एका चेकपोस्टवर तीन पथक ठेवण्यात आले असून, आठ तासांची त्यांना ड्यूटी
राहणार आहे.
पथक काय काम करणार
चेक पोस्ट उभारण्यात आलेल्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनांना थांबवून त्यातील प्रवाशांना आरोग्याबाबत विचारणा करणार. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकला, घशाचा त्रास असेल त्यांची विहित नमुन्यातील रजिस्टरमध्ये नोंद करून कोरोना किंवा कोरोनासदृश लक्षण असलेल्या व्यक्तींचे मोबाइलवर फोटो काढून त्यांचा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाºयाला तत्काळ देणार.

Web Title: Maharashtra 4- Corona Check Post on Gujarat border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.