Nashik: नाशिकमध्ये मनसेने उमेदवारी घोषित करताच माजी शहराध्यक्षांचा राजीनामा
By संजय पाठक | Published: October 25, 2024 03:08 PM2024-10-25T15:08:53+5:302024-10-25T15:13:08+5:30
Maharashtra Assembly Election 2024: नाशिक शहर हा मनसेचा बालेकिल्ला असला तरी यंदा पक्षाची मतदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिम मधून पक्षाने भाजपाचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला आहे.
- संजय पाठक
नाशिक - नाशिक शहर हा मनसेचा बालेकिल्ला असला तरी यंदा पक्षाची मतदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिम मधून पक्षाने भाजपाचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला आहे.
नाशिक पश्चिम विधान सभा मतदार संघातून भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिनकर पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. दिनकर पाटील यांनी भाजपकडून महापालिकेची निवडणूक लढवल्यानंतर त्यांना सभागृह नेतेपदही देण्यात आले होते. मात्र, लोकसभेपाठोपाठ, विधानसभा निवडणूकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी थेट कारण सांगितले नाही. मात्र, पक्षासाठी मी काय केले हे
वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. दिलीप दातीर मुळचे शिवसैनिक असून २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढवली
होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.