Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 12:33 PM2024-11-17T12:33:35+5:302024-11-17T12:35:27+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Bachchu Kadu : विधानसभा निवडणुकांनंतर कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेवर येणार नाही, यासाठी प्रहारच्या पाठीशी उभे राहून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांचे हित जोपासणाऱ्या विचारांचे सरकार आणण्यासाठी पाठीशी उभे राहा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. 

Maharashtra Assembly Election 2024 Bachchu Kadu Baglan Assembly Constituency | Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

सटाणा - विधानसभा निवडणुकांनंतर कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेवर येणार नाही, यासाठी प्रहारच्या पाठीशी उभे राहून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांचे हित जोपासणाऱ्या विचारांचे सरकार आणण्यासाठी पाठीशी उभे राहा, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी केले. 

बागलाण विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार जयश्री गरुड यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.१६) सटाणा येथील आयोजित सभेत आमदार बच्चू कडू बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नाने लोकसभेत इतिहास घडविला आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता बागलाणमध्ये प्रहारच्या माध्यमातून करावयाची आहे. दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी आपण एकमेव लढत आहोत. 

राज्यात प्रहारचे उमेदवार विजयी झाल्यास शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व दिव्यांगांचे दिवस आपण बदलल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त करतानाच काँग्रेस व भाजपा या पक्षांना त्यांची जागा दाखविण्यासाठी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केले. याप्रसंगी जयश्री गरुड, प्रहार जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी, गणेश काकुळते, किरण भोरे, यांची भाषणे झाली.

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. एखादे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतो परंतु शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न येते तेव्हा काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी प्रयल केले पाहिजे असे कडू यांनी सांगितले.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Bachchu Kadu Baglan Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.