Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:51 PM2024-11-05T12:51:02+5:302024-11-05T12:52:35+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Sameer Bhujbal : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज मागे घेत, अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Sameer Bhujbal nandgaon Assembly constituency | Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा

Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा

नांदगाव : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज मागे घेत, अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. आता नांदगाव विधानसभा मतदार संघात भयमुक्त वातावरण निर्माण होऊन विकासाची शिट्टी वाजेल अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली. 

गेल्या सहा महिन्यांपूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार अशी चर्चा असताना, नांदगाव जनतेच्या आग्रहाखातर माजी खासदार भुजबळ यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून नांदगावचे राजकीय वातावरणात बदल दिसून येत आहे. मतदारसंघाच्या विकासाची अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे

शिट्टी चिन्ह मिळाले 

चिन्ह वाटपाच्या वेळेस समीर भुजबळ यांना शिट्टी' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे भुजबळांच्या कार्यालयात शिट्टीचा एकच जल्लोष झाला. आता कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करीत विकासाची शिट्टी आता वाजविणार आहे. जनतेने आपले बहुमोल मत माझ्या शिट्टी या निशाणीला देऊन मला विजयी करावे, असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले आहे. 

नांदगावच्या विकासासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून 'भय' हद्दपार करण्यासाठी मी माघार घेत माझा पाठिंबा समीर भुजबळ यांना देत आहे. 
- भगवान सोनवणे. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Sameer Bhujbal nandgaon Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.