उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:49 PM2024-10-24T14:49:06+5:302024-10-24T14:51:45+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील एवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महत्वाचे म्हणजे, या मतदारसंघातून ते पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर, साधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश मतदार संघांतील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यानंतर आज अनेक ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपापला उेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील एवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महत्वाचे म्हणजे, या मतदारसंघातून ते पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहेत.
'आता एक शेवटची जाहीरसभा झाली की, काम संपले' -
विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, "एवला-लासलगाव मतदारसंघातून मी पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहे. दर वर्षी लोकसंग्रह आणि लोकप्रेम वाढत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, आपला विजय निश्चितपणे आहे. दर पंचवार्षिकला निवडणूक सोपी होत जात आहे. आता एक शेवटची जाहीरसभा झाली की, काम संपले आपले. कारण मी पाच वर्ष प्रत्येक दिवशी काम करत असतो."
छगन भुजबळ यांच्या हाती भाजपचा झेंडा -
रॅली दरम्यान एका कार्यकर्त्याने छगन भुजबळ यांच्या हाती भाजपचा झेंडा दिला. यानंतर भुजबळ तो झेंडा फडकावताना दिसले. यासंदर्भात विचारले असता, 'महायुती आहे आमची महायुती', असे भुजबळ म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.