सरोज अहिरेंसह देवळालीतील पाच उमेदवारांच्या खर्चात तफावत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 12:20 PM2024-11-09T12:20:17+5:302024-11-09T12:20:17+5:30
संबंधितांनी खर्च केला मान्य : बारा उमेदवार राहिले उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : देवळाली विधानसभा मतदासंघातील खर्चविषयक पहिल्या तपासणीत तब्बल पाच उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली. त्या सर्वांनी खर्च मान्य केल्याने त्यांच्या खर्चात त्याची नोंद करण्यात आल्याची माहिती खर्च निरीक्षक डॉ. पेरोयासामी एम. यांनी दिली. डॉ. पेरोयासामी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ८) शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी सभागृहात पार पडली. या खर्च तपासणीसाठी सर्व १२ उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शर्मिला भोसले यांनी दिली आहे.
या बैठकीत उमेदवारांच्या नोंदवह्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी खर्च नियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी माधवराव थेल, सहायक खर्च निरीक्षक संदीप पाठक, लेखांकन पथकाचे नियंत्रक विनोद खैरनार यांच्यासह अधिकारी तसेच राजेंद्र कोठावदे, योगेश वाघ व संजय सुसलादे हे कर्मचारी उपस्थित होते. प्रथम तपासणीत सरोज अहिरे यांच्या खर्चात ६३ हजार ९३१, राजश्री अहिरराव यांच्या खर्चात ४०४०, योगेश घोलप ३६०, अविनाश शिंदे ४,८६० आि विनोद गवळी १५० असा फर नोंदवला गेला.
उमेदवारांनी कारवाई मान केल्याने पुढील कारवाई टळली. दुस खर्च तपासणी बुधवारी (दि. १३ शासकीय विश्रामगृह 'शिवनेरी' ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प पडणार आहे.