नाशिकला पर्यटनाचा विकास नाही; संभाजी राजे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 09:00 AM2024-11-15T09:00:31+5:302024-11-15T09:01:28+5:30

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांची विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 nashik has no tourism development said sambhaji raje | नाशिकला पर्यटनाचा विकास नाही; संभाजी राजे यांची खंत

नाशिकला पर्यटनाचा विकास नाही; संभाजी राजे यांची खंत

आडगाव : कोल्हापूरनंतर नाशिक पर्यटनासाठी उपयुक्त जिल्हा आहे. नाशिकमध्ये गड किल्ले मोठ्या प्रमाणात असून त्याचे संवर्धन केले जात नसल्याची खंत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली. 

आडगाव येथील व्यायाम शाळा मैदानावर गुरुवारी (दि.१४) रात्री स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांची विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्यामध्ये फळबागा असून, फळबागांवर होणारे प्रक्रिया उद्योग येथे कोणत्याही सरकारने आजवर आणले नाही, अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी व महायुती यांच्या कारभारावर टीका करत शेतकऱ्यांचे शोषण, जीएसटी, राज्यात ढासळलेली आरोग्य सेवा, राज्यात बंद पडत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा याविषयी सरकारवर टीका केली. यावेळी यावेळी व्यासपीठावर मराठा आंदोलन समितीचे नानासाहेब बच्छाव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 nashik has no tourism development said sambhaji raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.