सुधाकर बडगुजर यांच्या कारकिर्दीत उद्धवसेनेचे संघटन अधिक मजबूत; कार्यकर्त्यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2024 10:27 AM2024-11-03T10:27:42+5:302024-11-03T10:28:38+5:30
विविध भागांतील शिवसैनिक करताहेत प्रचार
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी संघटनेची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाने गेल्या चार वर्षांत पक्षाचा कायापालट करून टाकला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यात बडगुजर यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळेच या कार्याची पावती म्हणूनच पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे, असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सिडको आणि सातपूर मतदारसंघात आयोजित प्रचार फेऱ्यांमध्ये व्यक्त केले.
गेल्या चार दशकांपासून बडगुजर कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी सिडको आणि सातपूर विभागातीलच नव्हे, तर शहरातील कार्यकर्ते देखील मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त झाले आहेत. यावेळी कार्यकर्ते बडगुजर यांच्या कार्याची माहिती देत आहेत.
महापालिकेत सलग तीन वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन त्यांनी शिवसेनेची बाजू ठामपणे उचलून धरण्याचे काम केले. त्यामुळेच सभागृह नेतेपद भूषविण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली.
महापालिकेत शिवसेनेची (उद्धवसेना) सत्ता यावी साठी बडगुजर यांनी भारतीय जनता पार्टीत गेलेले माजी आमदार वसंत गिते आणि माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांना पुन्हा पक्षात आणून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. महानगरात १२२ वॉर्डात नवीन शाखा उघडून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कठीण काळात अनेकांनी पक्षाची साथ सोडल्यानंतरही बडगुजर यांनी निष्ठा कायम ठेवली आणि संघर्षातून पक्ष टिकवून ठेवला त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली असून ते निवडून येतील, असा विश्वास प्रचारात व्यक्त करण्यात येत आहे.