नाशिकमध्ये पैसे वाटपाच्या आरोपातून उद्धवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, 2 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:54 PM2024-11-15T18:54:55+5:302024-11-15T18:55:28+5:30

अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Maharashtra Assembly vidhan sabha Election: Clash between Uddhav Sena and BJP workers on charges of money distribution in Nashik, 2 injured  | नाशिकमध्ये पैसे वाटपाच्या आरोपातून उद्धवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, 2 जण जखमी 

नाशिकमध्ये पैसे वाटपाच्या आरोपातून उद्धवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, 2 जण जखमी 

नाशिक : मतदार स्लिप वाटपाच्या कारणावरून नाशिकमधील सिडकोत भारतीय जनता पक्ष आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात दोन जण जखमी झाले असून अंबड पोलिस स्टेशनच्या बाहेर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

उद्धव सेनेच्या जमावाने आमच्या दोन कार्यकर्त्यांना जखमी केल्याचा दावा नाशिक पश्चिमच्या भाजपा उमेदवार सीमा हिरे यांनी केला आहे. सावतानगर येथे उद्धव सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाजवळ मतदारांना पैशांचे वाटप सुरू होते. ते रोखण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असता 40 ते 50 जणांच्या जमावाने आमच्या दोन कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचे सीमा हिरे यांनी सांगितले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Maharashtra Assembly vidhan sabha Election: Clash between Uddhav Sena and BJP workers on charges of money distribution in Nashik, 2 injured 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.