नांदूरशिंगोटे येथील महाराष्टÑ बॅँकेचे एटीएम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:23 PM2019-03-01T17:23:50+5:302019-03-01T17:24:45+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या एटीएमची अवस्था असून खोळंबा नसून अडचण, अशी अवस्था जाली आहे. एटीएम कार्ड असताना देखील परिसरातील ग्रामस्थांना तासनतास बॅँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या एटीएमची अवस्था असून खोळंबा नसून अडचण, अशी अवस्था जाली आहे. एटीएम कार्ड असताना देखील परिसरातील ग्रामस्थांना तासनतास बॅँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून येथील एटीएमकडून सुरळीत सेवा दिली जात नसून बॅँक प्रशासनाकडून देखील त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तालुक्यातील १५ ते १६ गावांची महत्वाची बाजारपेठ म्हणून नांदूरशिंगोटे गावची ओळख आहे. यासर्व गावांतील लोकांचा येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेशी दैनंदिन व्यवहार होत असतो. बाजारपेठ मोठी असून गावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
याठिकाणी बॅँक आॅफ महाराष्टÑाचे एकमेव एटीएम असून त्यामध्ये कधी पैसे आहेत तर कधी नाही, तर कधी मशीन बंद अशी स्थिती आहे. त्यातही ग्राहकाला कधी पैसे मिळाले तर पावती मिळत नाही, आणि कधी खात्यावरून पैसे कट होतात, मात्र, हातात मिळत नाही. त्याचप्रमाणे वेळोवेळी तांत्रिक बिघाड अशा अनेक कारणास्तव येथील एटीएम बंद असते. नांदूरशिंगोटे येथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, व्यापारीवर्ग आणि बाजारपेठ चांगली असून एटीएमची सुविधा मात्र असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे अनेकांकडे एटीएम कार्ड असूनही पैसे काढण्यासाठी बॅँकेच्या रांगांमध्ये दोन ते तीन तास थांबावे लागत आहे. बॅँकेकडून देण्यात येणार एटीएम कार्ड केवळ शोभेची वस्तू उरली असल्याची संतप्त भावना परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. बॅँक स्तरावरून या व्यवस्थेची खातरजमा करून ग्रामस्थांची अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.