महाराष्ट्र चेंबर, जीबीएसएमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:20 PM2018-10-26T23:20:58+5:302018-10-27T00:19:43+5:30
भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून भारत व दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण कोरियातील ‘जी-फेअर कोरिया’मध्ये महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर आणि गेओन्गिडो बिझिनेस अॅण्ड सायन्स एक्सिलरेटर (जीबीएसए) दरम्यान, सामंजस्य करार करण्यात आला आहे.
नाशिक : भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून भारत व दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण कोरियातील ‘जी-फेअर कोरिया’मध्ये महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर आणि गेओन्गिडो बिझिनेस अॅण्ड सायन्स एक्सिलरेटर (जीबीएसए) दरम्यान, सामंजस्य करार करण्यात आला आहे.
भारत आणि दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा या करारावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सह-चेअरमन आंतरराष्ट्रीय संबंध समितीचे अध्यक्ष मनप्रित नागी आणि गियॉन्गिडो बिझनेस अॅण्ड सायन्स एक्सिलरेटर, ग्लोबल ट्रेड डिव्हिजनचे कार्यकारी संचालक चोई आयके सुक यांनी स्वाक्षरी केली. संतोष मंडलेचा यांनी सामंजस्य कराराचा उद्देश दोन देशांमधील मजबूत व्यावसायिक संबंधांच्या विकासासाठी व्यावहारिक सुसूत्रता स्थापित करणे आणि परस्पर आर्थिक उद्दिष्टे अंमलबजावणी करणारी सहकार्याची प्रक्रिया निश्चित करणे असल्याचे सांगितले. यावेळी चंद्रशेखर सिंग, श्रीकृष्ण पराब, दीपाली चांडक, आशिष नहार, मेहूल देसाई, आशिष चांडक, शीतल देसाई, प्रज्ञा पोंक्षे, राजेंद्र वडनेरे, धनंजय बेळे, विश्वास सरमुकादम, प्रमोद पुराणिक, रामदास पाटील, यशवंत अमृतकर, सागर नागरे आणि वनिता घुगे आदी उपस्थित होते.