पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र चेंबरतर्फे भित्तीपत्रकाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:43+5:302021-09-27T04:15:43+5:30

नाशिक : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या पर्यटन समितीतर्फे भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात ...

Maharashtra Chamber unveils poster on the occasion of Tourism Day | पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र चेंबरतर्फे भित्तीपत्रकाचे अनावरण

पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र चेंबरतर्फे भित्तीपत्रकाचे अनावरण

Next

नाशिक : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या पर्यटन समितीतर्फे भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. शनिवारी (दि. २५) सकाळी पद्ममश्री राठी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्रात पर्यटनासाठी पोषक वातावरण, सोयी-सुविधा आहेत. राज्यात कृषी, धार्मिक, नैसर्गिक, प्राचीन गड-किल्ले आदी क्षेत्रात पर्यटन व्यवसायवृद्धीच्या संधी आहेत. पर्यटन संस्कृती रुजवल्यास त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो, या संधीचे सोने करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्राशी निगडित सर्वांची आहे. एकजूट केल्यास पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांक मिळवू शकतो, असे मत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी यावेळी मांडले. पर्यटन समितीचे चेअरमन दिलीप सिंग बेनिवाल यांनी केरळ व इतर राज्यात पर्यटन व्यवसाय कसा वाढीस गेला याबाबत माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन विकास अधिकारी नेमावा, तालुकास्तरावर काम केल्यास स्थानिक व्यवसाय व रोजगार मिळेल, असा विश्वास बेनिवाल यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी समितीच्या सुनीता फाल्गुने, स्वप्निल जैन, सत्यनारायण पांडे, जगदीश चौधरी, अविनाश पाठक उपस्थित होते.

-------- फोटो : आर ला : २६ महाराष्ट्र चेंबर ------------

Web Title: Maharashtra Chamber unveils poster on the occasion of Tourism Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.