Maharashtra : कोरोना विषाणूच्या Delta व्हेरिअंटनं चिंता वाढवली; केवळ नाशिकमध्येच सापडले ३० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:16 AM2021-08-07T09:16:57+5:302021-08-07T09:19:22+5:30
Coronavirus Delta Varient : नाशिकमध्ये सापडले कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण. त्यापैकी २८ रुग्ण ग्रामीण क्षेत्रातून.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला होता. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत होती. परंतु सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी पुण्यातही डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण सापडले होते.
नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी २८ हे ग्रामीण भागातील आहे. या लोकांचा रिपोर्ट जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्यानंतर आलेल्या रिपोर्टनुसार या लोकांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Maharashtra | 30 people have been infected with Delta variant in Nashik. 28 patients are from rural areas. We sent the samples to Pune for genome sequencing after which they were tested positive for Delta variant: Dr Kishore Shrinivas, Surgeon in Nashik district hospital (06.08) pic.twitter.com/h10FGpoHti
— ANI (@ANI) August 7, 2021
१३५ देशांमध्ये डेल्टा व्हेरिअंट
जागितक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १३५ देशांमध्ये तेजीनं पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिअंट सापडला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यापर्यंत जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० कोटी पर्यंत पोहोचू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. जगभरातील १३२ देशांमध्यये कोरोनाच्या बिटा व्हेरिअंटचे रुग्ण सापडले आहेत, तर ८१ देशांमध्ये गॅमा व्हेरिअंटच्या केसेस समोर आल्या आहेत. १८२ देशांमध्ये अल्फा व्हेरिअंटच्या चक १३५ देशांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण सापडले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.