Maharashtra Election 2019 : राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:32 AM2019-10-04T04:32:38+5:302019-10-04T04:33:03+5:30

राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे.

Maharashtra Election 2019: The family has landed in the assembly Election | Maharashtra Election 2019 : राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही

Maharashtra Election 2019 : राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही

Next

- धनंजय वाखारे

नाशिक : राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी एकमेव मालेगाव बाह्य मतदारसंघवगळता अन्य १४ मतदारसंघांत आजी-माजी आमदारांच्या कन्या-सुपुत्र आणि नातेवाईकांनाच निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

नांदगाव मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना राष्टÑवादीने तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली आहे. चांदवड मतदारसंघात माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना भाजपने दुसऱ्यांचा उमेदवारी दिली आहे. दिंडोरी मतदारसंघात जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र धनराज महाले यांना शिवसेनेने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबनराव घोलप यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार योगेश घोलप यांच्यावर शिवसेनेने दुसºयांदा विश्वास टाकला आहे. याच मतदारसंघात माजी आमदार बाबुलाल अहिरे यांच्या कन्या व भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी बंडखोरी करत राष्टÑवादीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे.

नाशिक पश्चिममधून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे सुपुत्र व माजी आमदार अपूर्व हिरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळवण मतदारसंघात माजी मंत्री ए. टी. पवार यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली आहे. इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून बंडखोरी करत शिवसेनेत दाखल झालेल्या निर्मला गावित या तिसºयांदा नशीब आजमावणार आहेत. त्या माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. मालेगाव मतदारसंघात माजी आमदार रशीद शेख यांचे सुपुत्र व कॉँग्रेसचे विद्यमान आमदार असिफ शेख पुन्हा एकदा कॉँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत. निफाड मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम आणि मंदाकिनी कदम यांचे सुपुत्र यतिन कदम हे अपक्ष उमेदवारी करत नशीब आजमावत आहेत. नाशिक पूर्वमध्ये मनसेचे माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र राहुल ढिकले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

नातेवाइकांचाही भरणा

येवला मतदारसंघात शिवसेनेने संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. संभाजी पवार हे येवला मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले मारोतराव पवार यांचे पुतणे आहेत. सिन्नर मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांनाही राजकीय वारसा आहे.

1962 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून विजयी झालेले शंकर वाजे यांचे ते नातू तर माजी आमदार रुक्मिणी वाजे या त्यांच्या चुलती आहेत. नाशिक मध्यमधून भाजपकडून उमेदवारी करणाºया आमदार देवयानी फरांदे या माजी आमदार ना. स. फरांदे यांच्या चुलत सून आहेत, तर बागलाण मतदारसंघातून राष्टÑवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण या माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019: The family has landed in the assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.