Maharashtra Election 2019 : संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 12:05 IST2019-10-11T12:04:20+5:302019-10-11T12:05:25+5:30
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट घेतली.

Maharashtra Election 2019 : संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, तर्कवितर्कांना उधाण
नाशिक- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे.
विरोधी पक्षात असताना राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सानप यांच्या निवास्थानी निवडणूक काळात भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे विशेष म्हणजे खासदार राऊत व आमदार सानप यांच्यात बंद खोलीत सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. बाळासाहेब सानप हे पाच वर्षे भाजपचे आमदार होते त्यांना नाशिक पूर्व मधून उमेदवारी नाकारल्याने ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत अशा स्थितीत खासदार संजय राऊत यांनी सानप यांची भेट घेतल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.